नवी दिल्लीतील ‘Evolve – The Global Fashion Runway’ मध्ये आयडीटी एज्युकेशन्सच्या विद्यार्थ्यांची यशस्वी प्रस्तुती
नवी दिल्लीतील ‘Evolve – The Global Fashion Runway’ मध्ये आयडीटी एज्युकेशन्सच्या विद्यार्थ्यांची यशस्वी प्रस्तुती
आयडीटी एज्युकेशन्सच्या फॅशन डिझाइन विद्यार्थ्यांनी देशातील प्रतिष्ठित फॅशन प्लॅटफॉर्म ‘Evolve – The Global Fashion Runway’ या भव्य फॅशन शोमध्ये आपली कला सादर करत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. हा फॅशन शो २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील निकुंज हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना फिटिंग डे, इंटरव्ह्यू डे आणि फॅशन शो डे अशा विविध टप्प्यांमधून फॅशन इंडस्ट्रीचा प्रत्यक्ष व मौल्यवान अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘Ivory Glamour Gala’ आणि ‘Beads & Beyond’ या दोन विशेष कलेक्शन्सनी आकर्षक फॅब्रिक्स, उत्कृष्ट हँडवर्क, ग्लॅमरस कट्स व नाविन्यपूर्ण स्टाइलिंगच्या जोरावर दिल्लीच्या रॅम्पवर विशेष लक्ष वेधून घेतले.
शो नंतर आयडीटी एज्युकेशन्सचे फाऊंडर व डायरेक्टर श्री. महेंद्र शेवाळे तसेच सेंटर हेड कु. स्वर्णिता देहाडे मॅडम यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. हे सर्व सन्मान भारतातील आघाडीच्या फॅशन डिझायनर अंजू मोदी आणि आयडीएचे संस्थापक व सीईओ बतुल अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याचप्रसंगी आयडीटी एज्युकेशन्सला विजेता म्हणून मानांकन मिळून विजयी धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आयडीटी नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव शाखांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये निकिता नागरे, रोशनी रुमने, दिशा सोळुंखे, ईश्वरी गुंजाळ, सानिका पाटील, दीपाली हलवार, तन्वी देशपांडे, लिपाक्षी सोनवणे, सानिया शेख, राजश्री बिरपन, वैश्णवी पाटील, मदिहा खान, ज्ञानेश्वरी दीक्षित, किर्ती पाटील, आयशा पाशा, दिव्या पाटील, शुभांगी सोनार, वैश्णवी बोरसे आणि श्रेया जैसवाल यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे आयडीटी एज्युकेशन्सचे प्रेरणादायी नेतृत्व, संस्थेचे फाऊंडर व डायरेक्टर श्री. महेंद्र शेवाळे आणि सौ. स्नेहल शेवाळे यांचे मार्गदर्शन, तसेच संपूर्ण स्टाफचे सातत्यपूर्ण सहकार्य मोलाचे ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर फॅशन इंडस्ट्रीसमोर आपले कौशल्य सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली.